Wikipedia

Search results

Saturday, June 19, 2021

स्वर्गीय पी. एन. पाणिक्कर यांच्या स्मरणार्थ १९ जून २०२१ वाचन दिनानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे आभासी ग्रंथप्रदर्शन (Virtual Book Exhibition)

 बालाघाट शिक्षण संस्था संचलित
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग आयोजित




 स्वर्गीय पी. एन. पाणिक्कर यांच्या स्मरणार्थ १९ जून २०२१ वाचन दिनानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे आभासी ग्रंथप्रदर्शन (Virtual Book Exhibition)


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ     

 

                                               वरील  लिंकमध्ये महाराष्ट्र शासनाने 1960 पासून प्रकाशित केलेली 444  दुर्मिळ पुस्तके/ग्रंथ पी.डी. एफ. स्वरूपामध्ये सर्वांसाठी मोफत खुले केलेले आहेत. आपण आपल्याला हवे ते ग्रंथ डाऊनलोड करू शकतो.  यामध्ये विविध विषयावरील अनेक दुर्मिळ ग्रंथ समाविष्टआहेत.

श्री.एस. के. जोगदंडे                डॉ. एम.सी. झाडे             डॉ.आर. के. ढोकळे             डॉ.एस.एल. कोरेकर  

         (ग्रंथपाल)                   (IQAC Co-ordinator )           (उपप्राचार्य)                            (प्राचार्य)

Wednesday, June 16, 2021

बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक

 

जन्म 14 जुलै 1856 - मृत्यू 17 जून 1895

विनम्र अभिवादन 



बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक.




      एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म  सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.

स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.

अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर कडाडून हल्ले

बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, ⇨जातिसंस्था, ⇨अस्पृश्यता, ⇨ बालविवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या कायद्याने नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते.

त्यांचे हे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्‍यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्रियांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, हजामत, जोडे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत; तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.

समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असला, तरी राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.

आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत: विकारविलसितअथवाशेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७),वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण.

विकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.

संदर्भ : १. अळतेकर, मा. दा. संपा. संपूर्ण आगरकर ३ भाग, पुणे, दु. आवृ. १९३७, १९१७, १९१८.

२. खांडेकर, वि. स. संपा. आगरकर, व्यक्ति आणि विचार, पुणे, १९४५.

३. गोखले, पु. पां. आगरकर चरित्र, पुणे, १९४४.

कुलकर्णी, अ. र.

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

संदर्भ: https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/91794b92a93e933-917923947936-906917930915930

राजमाता जिजाऊ संबंधित निवडक माहिती



 जिजाऊ

राजमाता जिजाऊ

जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. १२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर, बाबाजी आणि शहाजी भोसल्यांची अर्धांगिनी झाली ती १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला. त्या भोसले घराण्याला 'पृष्णेश्वर'मंदिराच्या जीणोंद्धाराचे श्रेय जाते. जिचे वर्णन 'शिवभारत २-४५' मध्ये केले 'गड:गेव गुणगम्भीरा व्यराजत महोदधिन् (अर्थात गुणगंभीर अशी गंगा समुद्राला शोभून दिसते, तशी जिजाबाई शहाजीला शोभली.) 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' तद्वतच युगपुरुष घडत असताना ते बीज आणि त्यावर होणारे संस्कार यांचा अन्योन्य संबंध होता. कारण शिवबांच्या जन्माच्या पार्श्वभूमीचा विचार करताना हा गर्भ जिजाऊंच्या उदरी वाढत असताना काय परिस्थिती होती? सभोवताली किंवा उभ्या महाराष्ट्रात. जाधव आणि भोसले या घराण्यांची सोयरीक जुळली खरी; पण मने मात्र जुळली नाहीत, त्यामुळे जिजाबाईंना फार वाईट वाटे. एका अकल्पित प्रसंगी जाधव व भोसले घराण्यात युद्धही जुपले. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. जिजाबाईंना असह्य होई. मराठ्यांच्या संसाराची, प्रदेशांची आणि तीर्थक्षेत्रांची दैना पाहून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ 'झगडणे आणि संघर्ष’ हा त्यांच्या जीवनाचा पायाच होता. शिवबाच्या जन्मापासून प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याशी करताना त्या डगमगल्या नाहीत. ही माता ह्या पुत्राच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मांड देऊन शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणारी ही माता, तिने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल. अस्मानी सुलतानी. संकटाची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन ‘शिवाई' देवीचा  कृपाप्रसाद म्‍हणून शिवाजी नामकरण करून त्‍यास इतिहासाचे बाळकडू पाजले, पुण्‍याच्‍या लालमहालात प्रवेश केल्‍यावर पुणे भूमी सोन्‍याच्‍या नांगराने नांगरून येथील आपल्‍या अस्तित्‍वाच्‍या पाऊलखुणा त्‍यांनीच उमटविल्‍या असेच म्‍हणावे लागेल.

प्रसंग रांझयाच्‍या पाटलाचा असो त्‍यात न्‍यायनिवाडा करण्‍याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाबाईकडूनच.  न्‍यायासनासमोर आपलाच अधिकारी गुंन्‍हेगार  म्‍हणून आल्‍यावर कारवाई करण्याचे प्रशिक्षण मिळाले. निःस्पृह आणि नि:स्वार्थी आंबे तोडल्याचा व त्यावर उपाय म्हणून आयुष्यभर अधीं बाहीचा शर्ट वापरण्याचे ब्रीद पाळणा-या दादोजींची निवड ह्यात त्यांच्या मुत्सद्देगिरीचा भाग जाणवतो. पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी व मावळ्यांमध्ये 'स्वराज्य स्थापना'चे बीज रोवून 'हिंदवी स्वराज्याचे' महान स्वप्न पाहण्याचे योगदान देणारी ती माऊली म्हणजे, 'स्त्री क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता असते' हे शब्दशः खरे करून त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वात स्वत:चे योगदान दिले. A low aim is a crime' हे तत्त्व लक्षात घेऊन स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी बाळगले.

तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब! म्हणतात त्याप्रमाणे, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'

हे वाक्य शिवराय सार्थ ठरवू शकले ते केवळ माँ साहेबांच्या करारी व नि:पक्षपाती स्वभावाचा त्यांच्यात उतरलेला अंश म्हणूनच! नेताजी पालकरांचे धर्मातर घडवून ह्या वीराच्या घरी स्वत: जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंढण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यातच ह्या मातेचे योगदान होते. आग्रा सुटका - प्रसंगानंतर बैराग्याच्या वेषात आलेल्या प्रतापराव गुजर ह्यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणा-या राजमाता जिजाऊ होत्या, म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू राज्यभिषेकाच्या काठावर पोहोचले.

पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली व जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीणोंद्धार केला. जिजाबाई शिवाजीच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवीत राहिल्या की, 'हे राज्य आमचे नाही, इथे लोक कंगाल आहेत, देवळे पाडली जात आहेत. गोरगरिबांना वाली उरलेला नाही, शिवबा, तू मोठा हो, यांचा पालनवाला हो.”

तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत. जाती-जमातीत व घराण्यांन्यायनिवडांच्या बाबतीत त्या नि:पक्षपाती होत्या. संतमहंतांचा आणि विद्वानांचा त्या योग्य परामर्श घेत असत. परिणामतः संत तुकाराम यांसारखे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले हा त्यांचाच दृश्य परिणाम होता.

अफजलखानाचे संकट आणि सिद्दी जोहरने पन्हाळ्याला दिलेला वेढा हे जिजाबाईंच्या जीवनातील पडले होते. संभाजी व शिवाजी जगले आणि त्यातील शिवाजीवर हे अफजलखानाचे संकट! पण अशाही स्थितीत मन कठोर करून त्यांनी शिवाजींना आशीर्वाद दिला.

'शिवबा तू विजयी होशील!’

पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी स्वतःच युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता आणि विलक्षण आवेश गोष्टी दिसून येतात. इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांना अपघात झाला आणि ते निवर्तले, हा वज्राघात झेलून त्या सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी विनवणी करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्या कर्तबगार सर्व राज्यकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई ह्या ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न! उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!'

स्त्रोत :शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७



साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मीत्त

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अन्नाभाऊ साठे पुर्ण नाव – तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण...